एच. व्ही. देसाई महाविद्यालया मध्ये एक महिन्यासाठी इंस्ट्रुमेंटेशन कोर्स घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने यु-व्ही, एफटीआयर, जिसि व एचपीएलसि इंस्ट्रुमेंट्स वापरून त्या बद्दल सर्व माहिती अवगत करून घेतली. विद्यार्थ्यां मधून सतत येणाऱ्या मागणीला विचारात घेऊन व डॉ. विक्रम पंडित यांच्या अथक प्रयत्नांनी या उपक्रमाला यश आले. डॉ. सुधीर अरभुज यांनी फोटोकॅटॅलीसीस या विषयावर मार्गदर्शन केले या वेळी सचिव श्री. हेमंत मणियार, श्री. दिलीप जग्गड, डॉ. गणेश राऊत, श्री. श्रीप्रकाश सोनी व डॉ. विक्रम पंडित उपस्थित होते.