आग्रहाचे निमंत्रण 🙏

कळविण्यास आनंद होतो की, द पूना गुजराती केळवणी मंडळ आपल्या शताब्दी वर्षात (Centenary Year) प्रवेश करीत असून मंडळाचे हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यंदाच्या वर्षी आपले माणिक महोत्सवी वर्ष (Ruby Jubilee Year) साजरे करत आहे. या महोत्सवांतर्गत महाविद्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

याचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून महाविद्यालयातील विविध विद्याशाखांमध्ये अध्ययन केलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा रविवार, दिनांक ७ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या सुसूत्र आयोजनासाठी महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की दिलेल्या लिंकच्या आधारे आपली नावनोंदणी करावी तसेच आपले वर्गमित्र आणि ओळखीत असणाऱ्या जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, असे आवाहन मंडळाचे चेअरमन श्री. राजेशभाई शहा यांच्या मार्फत करण्यात येत आहे. 

--------------------★------------------- 

माहिती भरण्यासाठी लिंक: https://forms.gle/xrAk8UaQjcVFXBFL9 

नावनोंदणीची शेवटची तारीख: २५ जून २०२४ 

अधिक माहितीसाठी संपर्क: वेबसाईट: www.hvdesaicollege.org 

ई-मेल: alumni@hvdesaicollege.edu.in 

मोबाईल नंबर: 7498310821 /  9422944333

https://hvdesaicollege.org/HVDesai/Alumni Conference Registration Link 2024-25